जिल्हा परिषद शाळा अडसरे खुर्द
गावात जिल्हा परिषद शाळेची स्थापना दिनांक १ मार्च १९५६ रोजी झालेली असून तेथे इयत्ता १ली ते ४ थी पर्यंत वर्ग असून शाळेत मुलांची संख्या ६५ आहे. आजमितीस शाळा षटकोणी व काँक्रीट स्लॅबची असून इतर वर्गांवर कोटींग पत्र्याचे पत्रे आहेत. भविष्यात HAL सी.एस.आर. निधी अंतर्गत सदर इमारत आर.सी.सी. बांधकामाचे नियोजन ग्रामपंचायत करत आहे.
आजचे बालक हे उद्याचे भविष्य आहेत. लहान वयातच मुलांच्या आकलनशक्ती वाढविण्यासाठी योग्य पद्धतीचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. खाजगी शाळांमध्ये चढाओढ सुरू झाली असून जिल्हा परिषद शाळांपुढे ते एक आवाहन तयार झाले आहे.
अडसरे खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील जिल्हा परिषद शाळा आधुनिक करण्याचा संकल्प केला असून खाजगी शाळेकडे वाढलेला कल लक्षात घेता जिल्हा परिषद शाळा ही ओसाड होत चालली आहे त्यासाठी जिल्हा परिषद शाळा देखील आधुनिक होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा वारंवार व्यक्त होत असताना याची गरज ओळखून वस्तीपासून शाळेपर्यंत विद्यार्थ्यांना सायकल सुविधा उपलब्ध करून देण्याचा ग्रामपंचायतीने प्रयत्न आहे
अडसरे खुर्द ग्रामपंचायत, इगतपुरी तालुका, नाशिक जिल्हा.


अडसरे खुर्द गावातील विकासकामे
इगतपुरी तालुक्यातच नाही तर अवघ्या नाशिक जिल्ह्यात राजकीय, सामाजिक व कृषी क्षेत्रात नावाजलेले म्हणून अडसरे खुर्द गावाची ओळख आहे.
सभामंडप
स्मशानभूमी


